सलीम मोमीन - लेख सूची

तर्क, श्रद्धा आणि निखळ संवादाचे उदाहरण

जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांच्यात देवाच्या अस्तित्वाबाबत झालेली चर्चा एका धर्मसमूहातील व्यक्तीशी एक विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक व्यक्ती किती निखळ, सभ्य आणि तर्काधिष्ठित संवाद साधू शकते, ह्याचे उत्तम उदाहरण ठरते. हा कार्यक्रम आयोजित करणारे, त्याचे मॉडरेटर सौरभ द्विवेदी, कार्यक्रमात सहभागी झालेले मुफ्ती शमैल नदवी, तसेच उपस्थित आमंत्रित वर्ग — ह्या सर्वांचेच अभिनंदन करायला हवे. …

नास्तिक्य, विवेक आणि मानवतावाद

विवेक-मानवता : विवेक आणि मानवतावादावर लिहताना प्रथम विनय म्हणजे काय, ह्याचा अभ्यास करावा लागेल. आपल्या विचारांचा अहंकार न बाळगता समाजभान राखून इतरांचा आदर करणे गरजेचे असते. विनम्रता तुमच्या वर्तनात सहजगत्या आलेली असावी. चांगले संबंध निर्माण करणे, सद्भावनांना प्रेरित करणे, इतरांची मते सर्वंकषपणे विचारात घेणे आणि व्यक्त होताना किंवा प्रतिक्रिया देताना सांवादिक राहाणे हाच विवेकशील वर्तनाचा …